मुंबई : पार्टी ड्रग म्हणून ओळख असलेल्या एमडीएम किं वा एक्सटॅसीच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षने दक्षिण मुंबईतून अटक के ली. परदेशातून चोरट्या मार्गाने आणण्यात आलेला हा अमलीपदार्थ अटक आरोपी मागणीनुसार देशभरात कु रिअर सेवेआडून पोचवत होते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

आमीर रफाई (२५) आणि इनायत अली ऊर्फ महोमद (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक्सटॅसीच्या सुमारे अडीजशे गोळ्या पथकाने हस्तगत के ल्या. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किं मत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अटक आरोपींपैकी इनायतअलीची कु रिअर सेवा आहे. त्याआडून तो अमलीपदार्थांची पोच करतो, अशी माहिती मालमत्ता कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित भोसले यांना मिळाली होती. त्याआधारे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक के दारी पवार यांच्या सूचनेनुसार निरीक्षक धीरज कोळी, भोसले आणि पथकाने जेजे मार्ग, डोंगरी परिसरात सापळा रचून दोघांना अटक के ली. हा साठा येमेन येथून भारतात आल्याचा दावा आरोपींनी के ला.

त्याबाबत पथकाकडून खातरजमा के ली जाणार आहे. आरोपींनी टाळेबंदीत कु रिअर सेवेआडून परदेशातून चोरट्या मार्गाने भारतात येणारे कोके न, एलएसडी, एमडीएमए आदी अमलीपदार्थ देशाच्या विविध भागांत पोहोचवल्याचा संशय पथकाला आहे.

त्या दृष्टीने त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अमलीपदार्थविरोधी पथकाच्या(एनसीबी) बंगळूरु विभागातील अधिकाऱ्यांनी नेदरलॅण्डहून उडिपी येथे आलेले पार्सल हस्तगत के ले. त्यात एक्सटॅसीच्या ७५० गोळ्या आढळल्या. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. उडिपी येथील महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा साठा वितरित होणार होता, असे या आरोपींनी एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले.