करोनाकाळात आर्ट सोसायटीची कलावंतांना मदत

संदीप आचार्य, लोकसत्ता

Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
art
कलाकारण: इथं नव्हतं आरक्षण; तरी दिसलेच गुण!
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

मुंबई : वारली चित्रकला ही बारक्याची खासीयत. यातूनच चार पैसे मिळायचे आणि संसाराचा गाडा चालायचा. करोनाने राज्यातील हजारोंचे रोजगार बुडाले. पालघर जिल्ह्य़ातील जव्हार येथे राहाणाऱ्या बारक्यापुढेही करोनामुळे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आणि चित्र काढणे सोडून तो भाजी विकायचे काम करायला लागला. बारक्यासारख्या जातीच्या कलावंताची अडचण लक्षात घेऊन ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या मदतीमुळे बारक्याची वारली चित्रकला पुन्हा बहरू लागली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो चित्रकार व शिल्पकार करोनामुळे बेरोजगार झाले आहेत. यातील बहुतेकांनी आपल्या हातातील ब्रश खाली ठेवला आणि पडेल ते काम करायला सुरुवात केली.  १०२ वर्षे जुन्या ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या चित्रकार व शिल्पकारांच्या संघटनेने कलावंतांची अडचण हेरली. अडचणीत सापडलेल्या सहकलाकारांना मदतीची गरज आहे हे लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष वासुदेव कामत, उपाध्यक्ष रवी देव, सचिव विक्रांत शितोळे, सदस्य साधना खडपेकर यांच्यासह अकरा सदस्यांच्या समितीने निधी संकलनास सुरुवात केली. मदतीची सुरुवात स्वत: च्या घरातून करण्याचा निर्णय घेऊन संस्थेच्या १२०० सदस्यांना निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. यातून तीन हजार ते लाखभर रुपयांपर्यंतची मदत बहुतेक कलावंतांनी केली. एक निश्चित रक्कम जमा झाल्यावर संस्थेने गरजू चित्रकार, शिल्पकारांकडून मदतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली.

सध्या संस्थेकडे तीनशेच्या आसपास अर्ज आले असून पहिल्या टप्प्यात सुमारे ५० कलावंतांना मदत करण्यात आली आहे. याबाबत साधना खडपेकर यांना विचारले असता, पुणे, नाशिक, सांगली, नगर, डहाणू, पालघर आदी राज्यांच्या वेगवेगळ्या भागांबरोबरच राज्याबाहेरूनही अर्ज आल्याचे सांगितले. एका समितीच्या माध्यमातून अर्जाची तपासणी केल्यानंतर दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे तीन महिने मदत केली जाणार आहे. अपेक्षा ही आहे की जेव्हा या कलावंतांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा त्यांनी मदतीची रक्कम संस्थेला परत करावी. यामुळे भविष्यात अनेकांना मदत करणे शक्य होईल. एका वारली चित्रकाराला मदत करण्यास सुरुवात केली तेव्हा ‘आता मला पुन्हा चित्र काढता येतील’ हे त्यांचे उद्गार बरेच काही सांगून गेले, असे खडपेकर म्हणाल्या.