बाजारात नवनवीन उत्पादने दररोज दाखल होत असतात. यातील अनेक उत्पादनांबद्दल अनेकदा ग्राहकांना माहितीच मिळत नाही. अशाच उत्पादनांच्या माहितीसह बाजारातील ‘नवलाई’ सांगणारे हे सदर आजपासून दर गुरुवारी.

कारची स्मार्ट कार

वापरलेल्या कारची विक्री करणारी कंपनी असलेल्या ‘महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स लि.’ने ‘कनेक्ट फर्स्ट’(ङल्लल्लीू३ो्र१२३) नावाचे कार उपकरण बाजारात आणले असून या उपकरणाद्वारे कोणतीही कार ‘स्मार्ट कार’ बनवता येऊ शकते. विप्रो लि.ने विकसित केलेले हे उपकरण देशभरातील ७०० शहरांमधील ‘महिंद्रा फर्स्ट चॉइस’च्या दुकानांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘कनेक्ट फर्स्ट’च्या माध्यमातून चालक स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या साह्याने आपल्या कारशी सदैव जोडला जातो. सुरक्षा, सुरक्षितता, देखभाल आणि उपयुक्तता या तत्त्वांवर हे उपकरण काम करते. या उपकरणाच्या माध्यमातून चालकाला आपल्या कारचे लोकेशन जाणून घेता येते. तसेच कार ‘टो’ केली जात असल्यास वा कुणी चोरीच्या हेतूने आत शिरण्याचा प्रयत्न केल्यास हे उपकरण तात्काळ मालकाला सतर्क करते.  याखेरीज बॅटरी व्होल्टेज, इंजिन कूलंट अशा बाबींसोबत कारची योग्य स्थिती हे उपकरण दर्शवते. या उपकरणाच्या खरेदीवर एक वर्षांसाठी अ‍ॅप नि:शुल्क पुरवण्यात येणार असून या उपकरणाला एक वर्षांची वॉरंटीही पुरवण्यात आली आहे.

किंमत : ७९९९ रुपये.

चेहरा आणखी खुलवण्यासाठी..

‘बीयू’ या जर्मन कलर सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रॅण्डने चेहऱ्यावरील ‘मेकअप’ अधिक खुलवणारी एक पारदर्शक पावडर भारतीय बाजारात आणली आहे. ‘बीयू ट्रान्स्परंट फिक्सिंग पावडर’ मेकअपच्या आधी लावल्यानंतर चेहऱ्यावरील त्वचा तेजस्वी आणि नितळ दिसते. या पावडरवर कोणत्याही प्रकारचा मेकअप वा फाऊंडेशन केला तरीही ते चांगल्याप्रकारे सेट होते व कोणत्याही त्वचारंगाशी (स्किनटोन) पूरक बनते, असा कंपनीचा दावा आहे. मेकअप आणखी खुलवणारी ही पावडर ‘मिरर कॉम्पॅक्ट’ डबीत ब्रशसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व आघाडीच्या रिटेल स्टोअरमध्ये ही पावडर विक्रीस उपलब्ध आहे.

किंमत : १६५० रुपये.