News Flash

नाटय़समीक्षक अरुण घाडीगावकर षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा

सोहळ्याच्या सुरुवातीला स्वप्निल पंडित प्रस्तुत ‘मेघमल्हार’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

आनंदयात्री आणि अरुण घाडीगावकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जानेवारी रोजी नाटय़समीक्षक अरुण घाडीगावकर यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती निमित्ताने ‘अरुण तुझी ‘साठी’ आमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते डॉ. जगदीश सामंत हे अध्यक्ष म्हणून तसेच ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर, आमदार उदय सामंत, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात घाडीगावकर लिखित ‘प्रसंगरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन सामंत यांच्या हस्ते होणार असून हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले आहे. सोहळ्याच्या सुरुवातीला स्वप्निल पंडित प्रस्तुत ‘मेघमल्हार’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 12:02 am

Web Title: arun ghadigaonkar birthday ceremony
Next Stories
1 मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास, आमीर खानकडून सुरक्षा कपातीच्या निर्णयाचे समर्थन
2 ८ ते १० तारखेदरम्यान मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
3 बॉलीवूड कलाकारांच्या सुरक्षेत कपात नाही – मुंबई पोलीस
Just Now!
X