पारंपारिक पद्धतीने खरेदी करताना आपण पैशांबाबत जितकी काळजी घेतो तितकी काळजी ऑनलाईन शॉपिंग करताना घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मुंबईत एका ३२ वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांना फसवल्याचे समोर आलं असून याद्वारे त्याने ७० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांना फसवून त्यांना ७० लाखांचा गंडा घालणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे त्याने आणखी काहींना फसवलं आहे की काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.