यंदाचा ऑगस्ट महिना हा वीकेण्डचा आनंद लुटू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. या महिन्यात लागोपाठ जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांसाठी हा महिना मोठी पर्वणी ठरेल. अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याच्यादृष्टीने या सुट्ट्या डोळ्यासमोर ठेवून प्लॅन्स आखले आहेत. सलग तीन आठवडे वीकेण्डला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मधले एक वा दोन दिवस रजा घेऊन सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे.

या महिन्यात ४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळून ४ दिवसांचा प्लॅन करता येऊ शकतो. त्यापुढील सलग आठवड्यात १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, १४ ऑगस्टला जन्माष्टमीला सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापुढील आठवड्यात पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शुक्रवार, शनिवार अशी लागून सुट्टी घेता येऊ शकेल.

५-६ ऑगस्ट – वीकेण्ड
७ ऑगस्ट – रक्षाबंधन (वैकल्पिक रजा)
१२-१३ ऑगस्ट – वीकेण्ड
१४ ऑगस्ट – जन्माष्टमी (वैकल्पिक रजा)
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
१७ ऑगस्ट – पतेती
२५ ऑगस्ट – गणेश चतुर्थी
२६-२७ ऑगस्ट – वीकेण्ड