मुंबई : धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी १४५० मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम १८ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या धारावी आणि वांद्रे येथील काही भागातील पाणीपुरवठा १८ आणि १९ जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

या जलवाहिन्यांच्या जोडकामानिमित्त जी उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील धारावीमधील गणेश मंदिर रोड, धारावी मेन रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुमभार रोड, दिलीप कदम मार्ग या परिसराला १८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर धारावीतील  प्रेम नगर, नाईक नगर, ६० फिट रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फिट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड या परिसराला १९ जानेवारी रोजी सकाळी ४ ते दुपारी या वेळेत होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एच-पूर्व परिसरातील वांद्रे टर्मिनस परिसरात १८ व १९ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.