News Flash

मुंबईत धावत्या बेस्ट बसला आग, थरार कॅमेऱ्यात कैद

आगीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

मुंबईतील गोरेगाव परिसरात आज सकाळी एका धावत्या बेस्ट बसला आग लागली. यामुळे एकच खळबळ माजली होती. गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात बसने अचानक पेट घेतला होता. आग लागल्याने बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र आगीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसने गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला. आग लागली तेव्हा बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये असणारे ड्रायव्हर आणि कंडक्टरने वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 12:21 pm

Web Title: best bus caught fire in goregaon
Next Stories
1 बालविवाह करणाऱ्या वकिलाला न्यायालयाकडून अंशत: दिलासा
2 धारावी पुनर्विकास प्रकल्प : निविदा प्रक्रिया रद्द होणार?
3 जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमधील निकृष्ट अन्नामुळे सहा डॉक्टरांना विषबाधा
Just Now!
X