19 October 2019

News Flash

BEST Strike : संपामुळे बेस्टचे आतापर्यंत १२ कोटीपेक्षा जास्त नुकसान

बेस्टच्या वाहतूक विभागाने पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस असून हा मुंबईतील बेस्टचा सर्वात मोठा संप ठरला आहे.

बेस्टच्या वाहतूक विभागाने पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस असून हा मुंबईतील बेस्टचा सर्वात मोठा संप ठरला आहे. बेस्टचा संप इतके दिवस चालेल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. शनिवारी सकाळी फक्त एका बस ड्रायव्हरची हजेरी पटावर नोंद झाली आहे. मंगळवारपासून एकही बस मुंबईच्या रस्त्यावर धावलेली नाही.

बेस्ट युनियनचे नेते आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. बेस्ट कामागारांच्या समस्यांमध्ये लक्ष घालण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आहे. २५ लाख मुंबईकरांना या संपाचा फटका बसत असून संपामुळे बेस्टचे आतापर्यंत १२ कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांच्या मदतीसाठी स्कूल बस संघटना पुढे आली आहे. या संघटनेने सुमारे १००० स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखी १००० खासगी बसही सेवा देण्यास तयार आहेत. स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली.

स्कूल बस रस्त्यावर उतरल्यानंतर या बसमधून प्रवास करताना १० किमीपर्यंत मुंबईकरांना २० रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतरच्या अंतरासाठी बेस्ट बस प्रमाणे भाडे आकारणी केली जाईल. तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल. स्कूल बस मालक संघटना आणि मुंबई बस मालक संघटनेकडून ही सेवा दिली जाणार आहे.

First Published on January 12, 2019 10:04 am

Web Title: best employees on strike 3