12 December 2018

News Flash

रमाबाई नगरमधील बंद शांततेत

घाटकोपर व आसपासच्या परिसरात कडकडीत बंद

( संग्रहीत छायाचित्र )

घाटकोपर व आसपासच्या परिसरात कडकडीत बंद

घोषणा देत घटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगराने बुधवारी पूर्वद्रुतगातीमार्ग रोखून धरला. मुंबईत अत्यंत संवेदनशील समजल्या जाणारम्य़ा या नगरातून कमालीच्या शांततेत बंद पाळण्यात आला, त्यासाठीचे आंदोलन करण्यात आले. रमाबाई नगर इतके शांत असूनही भाजपचा प्रभाव असलेल्या गारोडीया नागरसह घाटकोपर पूर्व कडेकोट बंद होते, हे विशेष.

चेंबूरमध्ये रस्त्यावर पार्क केलेली वाहने फोडण्यात आली, बंद काळात रस्त्यावर उतरलेली वाहने अडवून नुकसान करण्यात आले. मात्र अशा प्रकारची एकही घटना रमाबाई नगरात, पूर्व द्रुतगती मार्ग रोखून धरणारम्य़ा कार्यकर्त्यांकडून घडली नाही. नगरात, समोरील बाजूस पार्क केलेली शेकडो वाहने सुरक्षित होती.  बंद आहे हे माहीत असून निव्वळ अडचण म्हणून रस्त्यावर उतरलेली खासगी वाहने, रुग्णवाहिकांना या चक्कजाम मधून आपसूक मोकळी वाट मिळताना दिसली.

भीमा-कोरेगावच्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर मंगळवारी तब्बल आठ तास पूर्व द्रुतगती मार्ग रोखून धारल्यानंतर बुधवारी बंद निमित्त रमाबाई नगरातील अबाल वृद्ध पुन्हा रस्त्यावर उतरले. रमाबाई नगराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील द्रुतगती मार्गावर हा जमाव बसला. दिवस वर चढत होता तसा आसपासच्या उपनगरातून निळे झेंडे खांद्यवर घेतलेले घोळके या जमावात मिसळत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकीकडे जयघोष सुरू होता तर दुसरीकडे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविरोधात जोरदार नारेबाजी सुरू होती. रमाबाई नगाराच्या तोंडावर निषेधाच्या फलकांनी गर्दी केली होती. विविध संघटनांनी आपापल्या परीने निषेधाचा मजकूर फलकांवर लिहिलेला दिसत होता. त्यावरून गट गटांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.

मंगळवारचे आंदोलन माहीत असल्याने सकाळपासूनच पूर्व उपनगरात रस्त्यांवर किरकोळ वाहने दिसत होती. त्यातच पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील वाहतूक लाल बहाद्दूर वळवली होती. त्यामुळे अडीअडचणीत बाहेर पडलेली वाहनेज रुग्ण वाहिका वगळता द्रुतगती मार्गावर वाहतूक नव्हतीच. खासगी वाहन आले की चक्काजाम करणारे आंदोलक चौकशी करत. त्या वाहनाला वाट मोकळी करून देत. गर्दी पाहून पुढे जाण्यास घाबरणारम्य़ा अनेक वाहनांना आंदोलकांनी धीर दिला, पुढपर्यंत सोबत केली, पुढल्या टप्प्यावरल्या आंदोलकांची समजूत घालून ते वाहन पुढे जाऊ देण्यास मदत केली.

दरम्यान दुपारच्या सुमारास एक खासगी वाहन अडवण्यात आले. आतून नातेवाईक आजारी आहे, त्याला घेऊन डॉक्टर कडे जातोय असे उत्तर येताच. रुग्ण असलेल्या प्रवाशाला एका घोळक्याने बाहेर काढून तो खरोखरच आजारी आहे का ते चाचपण्यासाठी स्थानिक डॉक्टरकडे नेले. हे लक्षात येताच आंदोलकांमधल्या जुन्या, जाणत्या, अनुभवी करकर्त्यांनी या घोळक्याची कण उघडणी केली. त्यानंतर मात्र अडचणीतले एकही वाहन येथे खोळंबून पडले नाही.

रमाबाई नगराला हिंसक दंगलीचा इतिहास आहे. तसेच कोणत्याही घटनेचे पडसाद येथून लगेचच उमटतात. हे लक्षात घेऊन पोलिसांनी येथे जास्त बंदोबस्त जोडून दिला होता. पोलिसांची जल तोफ वरुन जलद कृती दलाचे जमाव पंगावणारे अद्य्यावत वाहन येथे दोन दिवस तळ ठोकून होते.

मात्र दोन्ही दिवसात येथे अत्यंत शांततेत आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आंबेडकरी जनतेने पुकारलेल्या आंदोलनात गुजराती, मारवाडी, जैन समाजाचे प्राबल्य असलेला घाटकोपर पूर्वेकडील परिसर दोन्ही दिवस कडेकोट बंद होता.

ती रुग्णवाहिका रोखली

रमाबाई नगारातील चक्काजाम ओलांडून विक्रोळी- घाटकोपर आशा चार फेऱ्या मारणारी शिवसेनेची रुग्णवाहिका दुपारी तीनच्या सुमारास आंदोलकांनी रोखली. रुग्णवाहिकेतून मोबाईलद्वारे पूर्ण परिसरातील वातावरणाचे चित्रीकरण सुरू होते. आंदोलकांनी चालकाचा मोबाइल तपासला तेव्हा त्यात साधारण १५ मिनिटांच्या ३ ध्वनिचित्रफिती आढळल्या. आंदोलकांनी मोबाईल जप्त करून रुग्णवाहिका माघारी धाडली.

First Published on January 4, 2018 1:51 am

Web Title: bhima koregaon violence effect in ghatkopar