21 March 2019

News Flash

भाजपा नगरसेवकाने इंजिनिअरच्या कार्यालयातून चोरली फाईल , पोलिसांनी केली अटक

भाजपाचे उल्हासनगर येथील नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी केल्याप्रकरणी शनिवारी अटक

भाजपाचे उल्हासनगर येथील नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी केल्याप्रकरणी शनिवारी अटक केली आहे. फाइल चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास बांधकाम विभागाच्या कार्यालयात भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रामचंदानी, कंत्राटदार शशांक मिश्रा व अभियंता जितू चोयथानी गप्पा मारत होते. बोलणे झाल्यावर तिघेही कार्यालयाबाहेर गेले. मात्र, रामचंदानी पुन्हा फोनवर बोलत तेथे आले आणि त्यांनी कार्यालयाचे कपाट उघडून एक फाइल काढली. ती शर्टमध्ये लपवून ते कार्यालयाबाहेर पडले, असे या व्डिडीओत दिसत आहे. शुक्रवारी रात्री फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार शहर अभियंता महेश शितलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामचंदानी यांना अटक केल्याने शहर भाजपाची चांगलीच नाचक्की झाली आहे.

First Published on May 14, 2018 8:54 am

Web Title: bjp corporator ulhasnagar stole file from cabin of pwd executive engineer arrested