24 September 2020

News Flash

करोनाबाधितांच्या संपर्कातील ६७ हजार जणांचा शोध

११ हजारांहून अधिक व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे

११ हजारांहून अधिक व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे

मुंबई : मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिकेने करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची जोरदार मोहीम हाती घेतली असून गेल्या अवघ्या पाच दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कातील ६७ हजार ९६५ व्यक्तींचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. विशेष म्हणजे यापैकी ११ हजार ६६८ संशयित रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळली असून या सर्वाची करोना काळजी केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या गर्दीमुळे पालिका अधिकारी धास्तावले असून मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पालिकेने करोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्याचबरोबर करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कातील ६७ हजार ९६५ व्यक्तींचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. यापैकी ११ हजार ६६८ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांना करोना काळजी केंद्रात पाठविण्यात आले आहेत. कमी जोखमीच्या गटातील व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत पालिकेने नऊ लाख ३६ हजार ५७४ करोना चाचण्या केल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 2:53 am

Web Title: bmc in search of 67000 people who has close contact with covid 19 patients zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘मेट्रो २ बी’ मार्गिकेवर आता दोन स्थानके कमी
2 मुखपट्टी न लावणाऱ्यांना पोलिसांचा धाक
3 गिरगावमध्ये रस्ता खचला
Just Now!
X