बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. तसंच  त्याला ७ दिवसांच्या आत उत्तर देण्यासही सांगितलं आहे. मुंबईतील पाली हिल येथे मनिषचं ऑफिस आहे. काही दिवसांपूर्वी बीएमसीने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यानंतर आता मनिष मल्होत्राला नोटीस बजावली आहे. त्यामुळे कलाविश्वात पुन्हा एकदा नव्या चर्चा रंगल्या आहेत.

मनिष मल्होत्राने त्यांच्या ऑफिसच्या इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम केलं आहे. मनिषने या इमारतीचं बांधकाम करताना काही नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळेच त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच ७ दिवसांच्या आत त्याला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका फिल्म’ या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतला नोटीस पाठवली होती. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. तसंच कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल ,असं पालिकेने नोटीसमध्ये कळवलं होतं असं सांगण्यात येत आहे.