03 June 2020

News Flash

अभिनेत्री हेमा उपाध्यायचा गटारात सापडला मृतदेह

कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे.

कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. ते मृतदेह कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरिश भंबानी यांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली येथील ठाकूर इंटरनॅशनल स्कूलमागे पोइसर नाल्यात हे मृतदेह सापडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये हेमा उपाध्याय आणि हरिश भंबानी यांचे मृतदेह गटारात फेकलेले सापडले. या दोन्ही मृतदेहांवर कोणतीही जखम न सापडल्याने त्यांचा गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भागवती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
हेमा आणि भंबानी हे दोघेही शुक्रवारी सायंकाळी ८.३० वाजल्यापासून बेपत्ता होते.  हेमा यांच्या घरी काम करणा-या हेमंत मंडल याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. भामभानी यांच्या कुटुंबियांनेही ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 6:32 pm

Web Title: bodies of artist hema upadhyay her lawyer found in mumbai drain
Next Stories
1 आनंदवनातील ‘दृष्टिदान यज्ञ’..!
2 तपशील उघड केल्याप्रकरणी सीबीआयची कानउघाडणी
3 मुंबई विद्यापीठात ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन’
Just Now!
X