म्हाडाची सदनिका हस्तांतरीत करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना म्हाडाच्या सुनील निकम (४३)  या मिळकत व्यवस्थापकाला (इस्टेट एजंट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. लाच घेताना रंगेहात पकडले जाऊ नये, म्हणून त्याने लोकल ट्रेनचा आसरा घेतला. मात्र लोकलमध्ये निकम याला अटक केली.
गिरगाव येथे म्हाडाची सदनिका विकत घेतल्यानंतर ती आपल्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील म्हाडाच्या कार्यालयात एका व्यक्तीने अर्ज केला होता. या कामासाठी अर्जदाराकडून मिळकत व्यवस्थापक सुनील निकम (४३) याने लाच मागितली. मात्र त्यासाठी निकम याने अर्जदाराला मुंबई सेंट्रल स्थानकात बोलावले. तेथून मरिन लाईन्स स्थानक आल्यावर निकम याने लाच स्वीकारली. मात्र या डब्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता.