ठाण्यातील शीळफाटा येथील इमारत कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या चार अधिकाऱयांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. पालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण, सहायक आयुक्त बाबासाहेब आंदळे, अभियंता रमेश इनामदार आणि लिपिक किसन मडके अशी या चौघांची नावे आहेत.
हे चारही आरोपी गेल्या एक वर्षापासून अटकेत होते. शीळफाटा येथील इमारत कोसळण्याच्या असून अद्याप तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना जामीन देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले.