वरळी येथील ‘कॅम्पा कोला’प्रकरणी पालिका अधिकारी आणि इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकावर वरळी पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. ‘कॅम्पा कोला’तील एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीची दखल घेत भोईवाडा महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर वरळी पोलिसांनी ही कारवाई केली. चंद्रु खेमानी यांनी भोईवाडा न्यायालयात इमारतीचा बांधकाम व्यावसायिक पुअर ड्रिंक्स प्रा. लि., पीएसबी कन्स्ट्रक्शन्स, बी. वाय, बिल्डर्स, कृष्णा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स आणि पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याची खासगी तक्रार केली होती.