News Flash

सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा सीबीआयसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाले…

कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयच्या टीमने केली चौकशी

प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष पथकाने शुक्रवारपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु केला आहे. या पथकामने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक आणि वैद्यकीय तपशील ताब्यात घेतले. सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. यापैकी एका टीमने आज कूपर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. कूपर रुग्णालयामध्येच सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदन करण्यात आल्याने त्याचसंदर्भात ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान डॉक्टरांनी शवविच्छेदनासंदर्भात धक्कादायक खुलासा केल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

नक्की पाहा >> सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : सीबीआयला शोधावी लागणार या १५ प्रश्नांची उत्तरं

सीबीआयने शुक्रवारी चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला. त्यानंतर आज सीबीआयच्या एका टीमने कूपर रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची चौकशी केली. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या पाचही डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये अनेक चूका असल्याचे सीबीआयच्या टीमच्या निदर्शनास आले आहे. एवढ्या घाई घाईत सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का करण्यात आलं असा प्रश्न सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विचारला असता एका डॉक्टरने थेट मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितलं होतं असा खुलासा या डॉक्टरने केल्याचे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. १४ जून रोजी सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात पंख्याला लढकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच दिवशी रात्री सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते.

सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येण्याच्या आधीच म्हणजेच १५ जून रोजी रियाने शवगृहात गेल्याची माहिती समोर आली आहे. तिथे ती ४५ मिनिटं थांबली होती. या प्रकरणावरुन आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी रियाला शवगृहामध्ये जाण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होता. रिया सुशांतच्या कुटुंबातील सदस्य नव्हती. त्यात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याने रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्याची आणि तिथपर्यंत जाण्याची परवानगी कोणी आणि का दिली यासंदर्भातील अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने खटला लढणाऱ्या वकीलांनाही रिया शवगृहामध्ये का गेली होती असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नक्की पाहा >> ‘तो फोन कोणी केला?, मृतदेह आधी कोणी पाहिला आणि…’; सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहला CBI ने विचारले हे दहा प्रश्न

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतची मोठी बहीण मीतू सिंह हीच्या विनंतीनुसार मृत्यूच्या दिवशीच सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सुशांतचे शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळी रुग्णालयामध्ये मीतूबरोबरच तीचे पती ओपी सिंह सुद्धा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 5:36 pm

Web Title: cbi officials asks why sushant singh rajput autopsy was conducted in a hurry doctors allege mumbai police asked them to do so scsg 91
Next Stories
1 मिरा-भाईंदर : प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
2 सीबीआयचं पथक पोहोचलं सुशांत सिंहच्या घरी; पाहणी करतानाचे फोटो आले समोर
3 ‘तो फोन कोणी केला?, मृतदेह आधी कोणी पाहिला आणि…’; सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहला CBI ने विचारले हे दहा प्रश्न
Just Now!
X