‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’चे (सीबीएसई) आणि ‘इंडियन सर्टिफिके ट ऑफ सेकं डरी एज्युके शन’चे (आयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे मंडळाने जाहीर केले आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांसाठी सर्वोत्तम गुण असलेल्या तीन विषयांच्या सरासरीनुसार गुण देण्यात येणार आहेत.

रद्द करण्यात आलेल्या विषयांसाठी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत.  सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परिस्थिती निवळल्यावर परीक्षेची एक संधी देण्यात येणार आहे. मात्र, ही परीक्षा ऐच्छिक असेल. त्याचप्रमाणे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत प्रत्यक्ष मिळालेले गुणच अंतिम मानण्यात येतील. दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र अतिरिक्त परीक्षेची संधी मिळणार नाही. त्याचप्रमाणे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षाची अतिरिक्त संधी देण्यात येणार नसल्याचे मंडळाने यापूर्वीच न्यायालयात स्पष्ट केले आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे?

* सर्व विषयांची परीक्षा दिलेले विद्यार्थी –  मिळालेले गुण ग्राह्य़ धरण्यात येतील.

* तीनपेक्षा अधिक विषयांची परीक्षा दिलेले विद्यार्थी – सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांच्या गुणांची सरासरी काढून परीक्षा रद्द झालेल्या विषयांसाठी गुण देण्यात येतील.

* तीन विषयांची परीक्षा दिलेले विद्यार्थी – सर्वोत्तम गुण मिळालेल्या दोन विषयांच्या गुणांची सरासरी काढून परीक्षा रद्द झालेल्या विषयांसाठी गुण देण्यात येतील.

* एक किंवा दोन विषयांची परीक्षा दिलेले विद्यार्थी – यामध्ये प्रामुख्याने बारावीचे आणि दिल्लीतील विद्यार्थी आहेत. परीक्षा दिलेल्या विषयांतील गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात येतील.