News Flash

पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रूळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठाण्याजवळील पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्यानजिक रेल्वे रूळाला तडे गेल्यानं ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्य़ांची लांबच लांब रांग पहायला मिळत आहे.

दरम्यान, याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासानानं काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 8:28 am

Web Title: central railway crack on track near parsik tunnel trains running late jud 87
Next Stories
1 सत्तेचा फराळ दिवाळीनंतर!
2 मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज
3 महाराष्ट्र आणि हरयाणातील नेतृत्व बदलाचा विलंब काँग्रेसला भोवला
Just Now!
X