महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेवर रविवारी कल्याण-ठाणे धीम्या मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वडाळा-वांद्रे या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते वांद्रे दरम्यानही मेगाब्लॉक असल्यामुळे या मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत गाडय़ा धावणार नाहीत.
’कल्याण-ठाणे धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत : कल्याणहून सीएसटीकडे येणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा कल्याण- मुलुंड दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. त्यामुळे या गाडय़ा ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत.
’सीएसटी-कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत: सीएसटीहून पनवेलकडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा कुल्र्यापर्यंत मुख्य मार्गावरून चालविण्यात येतील. मात्र या गाडय़ा चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.