मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरुच असून सोमवारी दुपारी कल्याण- ठाकुर्ली या स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

मध्य रेल्वेवर शुक्रवारी सकाळी माटुंगा – सायन स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. तर कसारा मार्गावर आटगावजवळ इंजिनमधील बिघाडामुळे या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. शुक्रवारच्या या घटनांनी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला असतानाच सोमवारी देखील कल्याण- ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहतूक कोंडी 
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ ब्लॉक घेतल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. दिवसभर पंधरा-पंधरा मिनिटांचे ब्लॉक घेतले जाणार असून प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने वाहतूक कोंडी झाली.