रमझानच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ६ जून ते ७ जुलै या काळात मुंबईतील काही भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे, तर काही भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यामुळे काळबादेवी रोडने उत्तरेकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक एक महिन्याच्या कालावधीत सायंकाळी ७ ते १० या दरम्यान ई.एम. रोडवरून वळवून मिनारा मशीद जंक्शनाला डावे वळण घेऊन मोहम्मद अली रोडवरून मांडवी जंक्शन आणि भेंडीबाजार जंक्शनकडे वळविण्यात आली आहे. तर बेस्टच्या १२५ आणि १३० यांचा मार्ग दररोज ६.३० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत भेंडीबाजार जंक्शन मोहम्मद अली रोड-महात्मा फुले मार्केट असा राहील. पार्किंगमुळे रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी पायधुनी वाहतूक विभागाच्या हद्दीतील मशिदीच्या प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ६ जून ते ७ जुलैपर्यंत पूर्णवेळ नो-पार्किंग करण्यात येत आहे.