म्हाडाचे घर स्वस्तात देतो, असे सांगून एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी शशिकांत शिर्सेकर व रुपेश किर्लोस्कर यांना वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अटक केली. शिर्सेकर हा एका राजकीय पक्षाचा शाखाध्यक्ष असून दोन आरोपी फरार आहेत. धारावीत राहणाऱ्या धमेंद्र आरमुले यांना सायन प्रतिक्षानगर येथील म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याचे आश्वासन शिर्सेकर व त्याचे साथीदार किर्लोस्कर, संदीप राऊत आणि निलेश राऊत यांनी दिले होते. याकामासाठी त्यांनी आरमुले यांच्याकडून ७ लाख रुपये उकळले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरमुले यांनी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांकडे तक्रार नोंदवली.