डीआरआय विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पश्चिम अफ्रिकेच्या ड्रग्ज तस्कराकडून १८ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. डीआरआय विभागाची मागील दहा दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन २ किलो ९३५ ग्रॅम आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त आहे. या ड्रग्ज तस्कराला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १८ कोटी रुपये आहे. पश्चिम अफ्रिकेतील गिनी येथील रहिवासी असलेल्या ड्रग्ज तस्कराला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  एक ड्रग्ज तस्कर आपल्यासोबत कोकेन घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या डीआरआयच्या विभागाला मिळाली. हे कळताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानंतर ड्रग्ज तस्कर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली  ताब्यात घेतलेला ड्रग्ज तस्कर मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव मुसा आहे असेही समजते आहे.

तस्कराकडे तब्बल १८ कोटींचे कोकेन
डीआरआयच्या आधिकाऱ्यांनी तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडचे २ किलो ९३५ ग्रॅम कोकेन जप्त  करण्यात आले. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या तस्कराला ८ डिसेंबर पर्यंत न्यायायलीन कोठडी सुनावली आहे.