पंडित चतुरलाल मेमोरिअल सोसायटीतर्फे २३ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रयास’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत पं. हरिप्रसाद चौरसिया व पं. सलील भट यांची मैफल रंगणार आहे. रसिकांसाठी या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.
प्रसिद्ध तबलावादक पंडित चतुरलाल यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त वरळी येथील नेहरू सेंटर येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बासरीवादक पं. चौरसिया आणि ‘सात्त्विक वीणा’ ज्यांनी निर्माण केली ते पं. भट यांच्या मैफलीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.
चौरसिया यांना तबल्यावर विजय घाटे तर भट यांना तबल्यावर प्रांचू चतुरलाल संगीतसाथ करणार आहेत. सहभागी कलाकार आणि उपस्थित रसिक यांच्यात संवादाचा कार्यक्रमही होणार आहे.
कार्यक्र माच्या विनामूल्य प्रवेशिका नेहरू सेंटर, महाराष्ट्र वॉच कंपनी, ऱ्हिदम हाउस येथे रसिकांसाठी उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर त्या दिल्या जाणार आहेत.