आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे काही खरे नाही, असा एकूणच सूर असला तरी गेल्या महिनाभरात व त्याही पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यात झालेल्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगवेगळे लढूनही आघाडी घेतली आहे.
नगर आणि धुळे महापालिका, नंदुरबार, धुळे, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळाले. अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे.
 रविवारी झालेल्या सहापैकी चार नगरपालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. विदर्भातील दोन नगरपालिकांचा अपवाद वगळता भाजप किंवा शिवसेनेला फारसे यश मिळालेले नाही.
शहरी भागात भाजप किंवा आम आदमी पार्टीला यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.