28 February 2021

News Flash

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं : मुख्यमंत्री

ख्रिश्चिअन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर इडी त्याच्याकडे चौकशी करीत असून चौकशीदरम्यान तो माहितीही देत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाला आहे. इडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये, गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, इटालिअन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचं नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे. ख्रिश्चन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर इडी त्याच्याकडे चौकशी करीत असून चौकशीदरम्यान तो माहितीही देत आहे.

या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिशेलने आपल्या एजन्सीसमोर जे खुलासे केले आहेत. तसेच जे कोर्टाला सांगितले आहे, यात सोनिया गांधींच नाव आहे. यामध्ये इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख आला आहे. यावरुन यात गांधी कुटुंबाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

या हेलिकॉप्टर घोटळ्यात कालपर्यंत राहुल गांधी एचएएलच नाव घेत होते. यात एचएएलच नाव होतं, मात्र, त्याला दुय्यम स्थान देण्यात आलं होतं. दुसरी एक बाब यात समोर आली ती म्हणजे, मिशेलने त्याच्या वकिलांना एक चिठ्ठी दिली, त्यात त्याने सोनिया गांधींच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याची उत्तरे कशी द्यायची हे त्यानं विचारलं. जर सोनिया गांधी यांच्यात सहभागी नसतील तर त्याने हे का केलं, असा सवाल यावेली फडणवीस यांनी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 2:02 pm

Web Title: congress should clarify on agustawestland scandal chief minister
Next Stories
1 सेवानिवृत्ती वय ५८ करण्याचा एमटीएनएलचा पुन्हा प्रस्ताव!
2 वरळी आग: अग्निशमन दलाच्या १२ कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास
3 नव्या वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर १० नवीन स्थानके
Just Now!
X