06 July 2020

News Flash

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही

महादेव शेलार यांचे संग्रहित छायाचित्र

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. महादेव शेलार हे मुंबईतील मुलुंड या उपनगरातील एलबीएस मार्गावर असलेल्या बिलवा कुंज या इमारतीत वास्तव्य करत होते. शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली? हे अद्याप समोर आलेले नाही. ते ६४ वर्षांचे होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला, हे लक्षात येताच त्यांना फोर्टिस रूग्णालयात तातडीने नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले. महादेव शेलार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. महादेव शेलार व्यवसायाने वकील होते. शांत स्वभावाचे आणि अभ्यासू म्हणून ते प्रसिद्ध होते. काँग्रेसची सत्ता असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे नेते अशी महादेव शेलार यांची ओळख होती. अनेक टीव्ही चर्चांमध्येही त्यांनी बऱ्याचदा सहभाग नोंदवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2017 6:04 pm

Web Title: congress spokesperson mahadev shelar commits suicide at his residence
टॅग Congress
Next Stories
1 ‘कृष्णकुंज’बाहेर मनसैनिकांची उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
2 सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई ४५ व्या स्थानी; टोकियो पहिल्या क्रमांकावर
3 माफियांच्या पैशांमधून नगरसेवकांची खरेदी; सोमय्यांचा सेनेवर आरोप
Just Now!
X