वक्ते गिरीश कुबेर

मुंबई : ‘करोनापश्चात ग्राहक आणि ग्राहक चळवळ’ या विषयावर मुंबई ग्राहक पंचायततर्फे आयोजित वेबिनारमध्ये ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे विचार ऐकायला मिळतील. करोनापश्चात काळात ग्राहकाची भूमिका, ग्राहक चळवळीची गरज, दिशा अशा अनेक बाबींकडे पाहताना काय करावे लागेल या उद्देशाने मुंबई ग्राहक पंचायततर्फे या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २ जूनला सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत हे वेबिनार होईल. हे वेबिनार सर्वासाठी खुले असून त्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या www.mymgp.org या वेबसाइटवर पूर्वनोंदणी करता येईल. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे दर आठवडय़ाला ग्राहक चळवळीच्या अनुषंगाने विविध विषयांवर वेबिनारशृंखला आयोजित केली जात असून, हा पाचवा वेबिनार आहे.