आयात निर्यातीसाठी जेएनपीटी बंदरात येणाऱ्या कंटेनर मधील मालाच्या चोरीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.  परदेशातून आयात करण्यात आलेला माल मागणीपेक्षा कमी आल्याने उरण व जेएनपीटी पोलीस ठाण्यात शिपींग एजन्सीज तसेच गोदाम चालकांनी तक्रारींची नोंद केली होती.
जासईमधील या कारवाई दरम्यान पुसाई तराई उर्फ अण्णा मुथैया ,शिवकुमार उर्फ बंटी बन्स बहादूर सिंग ,रामचंद्र विश्वनाथ वाडकर ,योगेश हवलदार सिंग, ,दिवाकर श्रीरामचरण सिंग व मुर्तजा गुलमोहम्मद खान यांना सहा जणांना पोलिसांनी पकडले.  त्यांना उरण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
वांगणीत देवळातून सोन्याची मूर्ती लंपास
प्रतिनिधी, ठाणे : वांगणी येथील राजाराम दळवी यांच्या मालकीच्या दत्त मंदिरातून शनिवारी संध्याकाळी २० तोळ्यांची सोन्याची गणेश मूर्ती चोरटय़ांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या मंदिराचे लाकडी तसेच लोखंडी दरवाजे तोडून चोरांनी मूर्ती पळवून नेली. गेले काही महिने सातत्याने वांगणीत चोऱ्यांचे प्रकार घडत आहेत.