News Flash

करोना चाचणी आता ७८० रूपयांत

सर्वसामान्यांना राज्य सरकारचा दिलासा, शुल्कात २०० रुपयांची कपात

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

त्यानुसार आता केवळ ७८० रुपयांमध्ये कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा करोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांसाठी ४५०० रुपये असा दर निर्धारित केला होता. प्रत्यक्षात मात्र या चाचण्यांसाठी लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात होते. मात्र सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने करोना चाचणीच्या दरात सातत्याने कपात करत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने करोना चाचणीचे दर कमी करताना सप्टेंबर महिन्यात हे दर ९८० रूपयांपर्यंत कमी के ले होते. आता करोना चाचणीसाठी लागणा्ऱ्या साहित्याच्या किं मतीत घट झाली असून सर्वोच्च न्यायालयानेही लोकांना कमी दरात चाचणी करून मिळावी  अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्याच्या दरात आणखी २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित के ला जाणार आहे. त्यानुसार प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केल्यावर ७८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, विलगीकरण केंद्र प्रयोगशाळा येथून नमुना (सँपल) गोळा करून तपासणी करण्यासाठी १२०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेऊन तपासणी करण्यासाठी १६०० रुपये असा कमाल दर निश्चित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:01 am

Web Title: corona test even cheaper abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुलाबी चेंडूचा अडथळा कसा पार करणार?
2 आरक्षित उमेदवारांना जातप्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र बंधनकारक
3 तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
Just Now!
X