आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता

मुंबई: करोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे जिल्हयांची पाच टप्यांत विगतवारी करून त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावास गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
या निकषांच्या आधारे निर्बंध शिथिल करण्याबातचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत.
निर्बंध शिथिल करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार करोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आणि २५ टक्यांपेक्षा कमी प्राणवायू खाटांवर रूग्णांची भरती असलेल्या जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटवावेत आणि तेथील जनजीवन पूर्ववत सुरू करावे. याचा फायदा १८ जिल्ह्याना होऊ शकतो.
दुसऱ्या टप्यात ज्या जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आणि २५ ते ४० टक्यांच्या दरम्यान प्राणवायू खाटा व्याप्त जिल्हयांमध्ये सर्व दुकाने उघडावीत. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तसेच सरकारी, खाजगी कार्यालयने,उद्यान,खेळाची मैदाने सुरू करावीत. मॉल,उपहारगृह, सिनेमागृह,लग्न,बैठका ५० टक्के क्षमतेने सुरू करावेत असा प्रस्ताव आहे.
तिसऱ्या टप्यात करोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ते १० टक्यांच्या दरम्यान आणि प्राणवायूच्या ४० टक्के पेक्षा अधिक खाटा रूग्णांनी भरलेल्या असतील अशा जिल्ह््यात अत्यावश्यक सेवेतील दुुकाने दररोज सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शनिवार-रविवार बंद राहतील. मॉल्स, थिएटर बंदच राहतील. उपहारगृह ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ सुरू राहतील. २ वाजल्यानंतर घरपोच सेवा सुरू राहील. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ परवानगी असेल. खाजगी, शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.इंडोअर आणि आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ सोमवार ते शुक्रवार परवानगी तसेच चित्रपट, मालिका चित्रिकरण स्टुडिओत करण्यास परावनगी, मात्र गर्दी जमेल अशा चित्रकरणाला परवानगी नाही. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल. लग्न सोहळे ५० लोक उपस्थितीत तर अत्यंसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
चौथ्या टप्यात साप्ताहिक बाधितांचे प्रमाण १० ते २० टक्के दरम्यान आणि प्राणवायू खांटाचा वापर ६० टक्के पेक्षा अधिक असेल अशा जिल्ह््यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील.अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने,मॉल्स, थिएटर बंदच राहतील. उपहारगृह केवळ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.सलून, व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने वातानुकुलीत यंत्राचा वापर न करता, सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सोमवार ते शुक्रवारी सकाळी ५ ते ९दरम्यान परवानगी असेल. खाजगी, शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी तर इंडोअर खेळास बंदी असेल. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही, लग्न सोहळयास २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी, सार्वजनिक बसेस ५० टक्के आसनक्षमतेने सुरू राहतील.
पाचव्या टप्यात बाधितांचे साप्ताहिक प्रमाण २० टक्के पेक्षा अधिक आणि प्राणवायूच्या खाटा ७५ टक्के पेक्षा अधिक व्याप्त असेल्या रेड झोनमधील जिल्हयात सबळ कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत सुरू असतील. अन्य दुकाने बंदच असतील. उपहारगृहातून के वळ घरपोच सेवा देता येईल. बाकी सर्व बंद असेल असा ह प्रस्ताव आहे.
या प्रस्तावानुसार पहिल्या टप्यात १८ जिल्ह््यांतील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग सर्व जिल्ह््यांतील परिस्थितीची खात्री के ल्यावर निर्णय जाहीर होईल.
प्रस्ताव असा…
निर्बंध शिथिल करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार करोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आणि २५ टक्यांपेक्षा कमी प्राणवायू खाटांवर रूग्णांची भरती असलेल्या जिल्ह््यातील सर्व निर्बंध हटवावेत आणि तेथील जनजीवन पूर्ववत सुरू करावे. याचा फायदा १८ जिल्ह्यांना होऊ शकतो.