करोनाकाळात हजारो नागरिकांना भयमुक्ती देण्यात यशस्वी

मुंबई : करोना विलगीकरणात जाणवलेल्या एकटेपणाच्या आठवणी, करोनामुळे भोवतालच्या लोकांचे होणारे मृत्यू, शारीरिक कुरबुरी इत्यादी कारणांमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींसाठी विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघा’ने ‘सुजीवन’ हे ‘करोना पश्चात रुग्ण समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र’ सुरू के ले आहे. गंभीर वातावरणामुळे मनात मृत्यूची भीती घेऊन बसलेल्या व्यक्तींना पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी या केंद्राची मोठी मदत होत आहे.

करोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेकांना नैराश्य येते, निद्रानाश होतो. काहींना भासही होतात. अशा रुग्णांचे समुपदेशन के ले जात असल्याची माहिती डॉ. मानसी भट यांनी दिली. करोना होऊन गेल्यानंतर पुन्हा आपल्या कार्यालयीन कामाकडे वळताना काहींचा आत्मविश्वास कमी झाला आहे. काहींना अजूनही श्वास घेण्यास त्रास होत आहे, असा अनुभव डॉ. अनुजा वैद्य यांनी सांगितला.

डॉ. संध्या अलाट यांनी अनेक व्यक्तींना प्रत्यक्ष, तर काहींना दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन केले आहे. एप्रिलमध्ये संपूर्ण कु टुंबाला करोना होऊन गेल्यानंतर अंधेरीच्या संतोष के ळकर यांनी ‘सुजीवन’चा आधार घेतला. करोनापश्चात रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ते चिंतेत होते; परंतु व्यवस्थित काळजी घेतली तर रक्तदाबाचा त्रास बंद होईल, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. या केंद्रात जाऊन आल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याचे  त्यांनी सांगितले.

 उपचारांचेही मार्गदर्शन…

समुपदेशन करून रुग्णाच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी प्रयत्न के ले जातात. मोठ्या प्रमाणावर उपचारांची गरज भासल्यास रुग्णांना तज्ज्ञांकडे पाठवले जाते. तेथील औषधोपचारांच्या खर्चात काही प्रमाणात सूटही दिली जाते. गेल्या काही महिन्यांत हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असून २६१४१२७६, २६१४२१२३ या दूरध्वनी क्रमांकावर गरजूंच्या नातेवाईकांना संपर्क साधता येईल.

मोलाचा आधार…

  • करोनाबाधित असताना रुग्णाला सर्व प्रकारची मदत मिळते. मात्र करोना होऊन गेल्यानंतर काही महिने थकवा जाणवतो किं वा मनावर दडपण असते.
  • विलगीकरणात असताना कु टुंबापासून दूर राहिल्याने रुग्ण चिंताग्रस्त होतात.
  • अशा परिस्थितीत ज्यांचे मानसिक खच्चीकरण झाले, त्यांच्यासाठी या संस्थेने मोलाचा आधार दिला.

हे सारे कसे घडते?

करोनातून मुक्त झाल्यानंतर १८ दिवसांनी भयग्रस्त व्यक्तींना ‘सुजीवन’ केंद्राच्या सेवेचा लाभ घेता येतो. रुग्ण केंद्रात आल्यानंतर त्याची वैद्यकीय पार्श्वभूमी, कागदपत्रे, आजाराची तीव्रता यांची तपासणी के ली जाते. त्यानंतर प्राथमिक व्यायाम, आहार यांविषयी मोफत मार्गदर्शन के ले जाते.