28 September 2020

News Flash

धक्कादायक! कारवाई करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढले, शिवीगाळ करत जबर मारहाण

पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण फरार आहे.

करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असल्याने कोणीही नियमांचं उल्लंघन करणार नाही यासाठी पोलीस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहे. मात्र अनेक ठिकाणी लोक नियम तोडत असून पोलीस कर्मचाऱ्यांवरच हात उचलत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना मानखुर्दमध्ये समोर आली आहे. अनधिकृतपणे फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना महिलांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी त्यांनी अश्लील भाषा वापरत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलीस कर्मचारी आणि पालिकेचं पथक कारवाईसाठी गेलं होतं. लल्लूभाई वसाहतीत पोलिसांनी फेरीवाल्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या महिलांना रोखलं. अधिकारी हातगाडी जप्त करत असताना महिलांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

यावेळी महिलेने अधिकाऱ्यावर हात उचलला आणि नंतर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने तिथे उपस्थित महिला अधिकाऱ्याचे केस ओढत मारहाण केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तिच्यासोबत अजून एक वृद्ध महिलादेखील उपस्थित होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “फेरीवाले हातगाडी घेऊन रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं अजिबात पालन केलं जात नव्हतं. आम्हाला फोन करुन याची तक्रार देण्यात आली होती. आम्ही अनेकांच्या हातगाड्या जप्त केल्या. पण एका कुटुंबाने विरोध करत पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली”.

या मारहाणीत दोन महिला पोलीस कर्मचारी शीतल माने आणि देवयानी कुटे जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एकजण फरार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:59 pm

Web Title: coronavirus vendors attack police in mankhurd sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 …आता काळजी डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक आरोग्याची!
2 धक्कादायक, मुंबईत १५ ते २० नौसैनिकांना करोनाची लागण, भारतीय नौदलात करोना व्हायरसचा शिरकाव
3 धारावीतील करोना रुग्णांची संख्या शंभरपार
Just Now!
X