करोनाच्या भयगंडापायी अहवाल जाणण्याची अतिरेकी धडपड; रुग्णाच्या कुटुंबीयांना मनस्ताप

मुंबई : भांडुपमध्ये वास्तव्य करणाऱ्या वयोवृद्धाचा करोना चाचणी अहवाल प्रयोगशाळेतून रुग्णालयाला, कुटुंबाला मिळण्याआधी संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने आपली ओळख वापरून मिळवला. आणीबाणी निर्माण झाल्याप्रमाणे त्याने या कुटुंबाला कार्यालयात बोलावून प्रश्नाच्या फै री झाडल्या. आधीच त्रस्त असलेल्या या कु टुंबाला या प्रसंगामुळे आणखी मनस्ताप घडला.

रुग्ण वयोवृद्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मूत्रपिंडाशी निगडित विकार होता. २२ मे रोजी त्यांची प्रकृ ती बिघडल्याने त्यांना मुलुंडमधील डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथून घरी परतल्यावर त्यांची प्रकृ ती आणखी बिघडली. ऑक्सिजन पातळी कमी असल्याने जवळपासचे एकही रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार नव्हते. अखेर हिरानंदानी रुग्णालयाने दाखल करून घेतले. रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी जुजबी उपचार करून अतिदक्षता विभागाची व्यवस्था असलेल्या इतर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना मुलुंडमधील खासगी रुग्णालयात दाखल के ले. तेथे मूत्रपिंड विकाराशी निगडित चाचण्यांसोबत करोना चाचणीही करून घेतली. त्याचे अहवाल रविवारी संध्याकाळी येणे अपेक्षित होते. दोन दिवस डायलिसिसद्वारे उपचार के ल्यानंतर रुग्णालयाने वृद्धाला घरी सोडले.

२४ मे रोजी वृद्धाला घेऊन कु टुंब घरी पोहोचते न पोहोचते तोच गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. वृद्धाच्या मुलाला अध्यक्षाने संस्थेच्या कार्यालयात बोलावले. मुलगा तिथे गेला तेव्हा अध्यक्षाने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर येऊन पडलेला वृद्धाचा चाचणी अहवाल दाखवला. तुमचे वडील करोनाबाधित आहेत, असे सांगत त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू  के ली. ओळखीतल्या व्यक्तीने अहवाल मिळवून दिला, असे अध्यक्षाने मुलाला सांगितले. या प्रसंगामुळे भयचकित झालेल्या मुलाने रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र प्रयोगशाळेतून रुग्णालयाला अहवाल प्राप्त झाला नव्हता. आमच्या हाती येण्याआधी अहवाल शेजाऱ्यांना कसा समजला याबाबत कु टुंबाने रुग्णालय आणि प्रयोगशाळेकडे तक्रोर के ली आहे. हे कुटुंब भांडुप पोलीस ठाण्यातही लेखी तक्रोर करणार आहे.

महापालिके कडे खोटी तक्रोर

करोनाबाधित वृद्धाचे कु टुंब नियम धुडकावून घराबाहेर पडते, अशी तक्रोर शेजारी राहणाऱ्यांनी महापालिके कडे के ली. एस. विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खातरजमा के ली, तेव्हा तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले. वडिलांचा अहवाल मिळताच स्वत:हून पालिके शी संपर्क साधला. पालिका अधिकाऱ्यांनी वडिलांचे वय पाहता त्यांना घरीच अलगीकरणाच्या सूचना के ल्या. त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करत असूनही इमारतीतून खोटय़ा तक्रोरी होत आहेत, असे वृद्धाच्या मुलाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.