संगीतकार, गीतकार रवींद्र जैन यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुहू येथील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या जवळ असलेल्या ‘आजिवासन’ येथे जैन यांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, अभिनेते सचिन पिळगावकर, रणजित, आदींनी तसेच जैन यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी राजकीय सामाजिक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुपारी जुहू येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 5:56 am