26 November 2020

News Flash

कराची बेकरीच्या नावावरुन शिवसेनेत दोन भूमिका, संजय राऊत म्हणतात नाव बदलणं अयोग्य

महाराराष्ट्रात रहायचं असेल तर असं नाव चालणार नाही, असं नांदगावकर म्हणालेले आहेत.

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघडपणे समोर आलं आहे.

”मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान कराची पाकिस्तानातील आहे त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो, नितीन नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे.  “मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे तुम्ही पाकिस्तानला एक प्रकारे पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं. महाराराष्ट्रात रहायचं असेल तर असं नाव चालणार नाही.” असंही नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

कराची स्वीट्स संपूर्ण देशात पसरलेली फूड चेन आहे. साधरणपणे प्रमुख शहरं आणि महानगरं यामध्ये कराची स्वीट्सची उत्पादनं विकणारे अनेक आऊटलेट्स आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी कराची बेकरीचे आऊटलेट्स आहेत. या बेकरीच्या नावातील कराची या शब्दाला नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच मुंबईतील कराची बेकरीच्या सगळ्याच आऊटलेट्सना त्यांनी इशारा दिला आहे. नाव रद्द करावं किंवा कराची हा शब्द काढून टाकावा अशीही मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे.

मनसेचा कराची स्वीट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचण्याचा इशारा –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्स दुकानाच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवलं आहे. ”देशातील पारंपारिक शत्रू पाकिस्तानातील कराची या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित आस्थापन सुरू केलं आहे. त्याचा प्रचार व विस्तार करून भारतीयांचा भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसंच मराठी भाषेचाही द्वेश करत आहात त्याबाबत आक्षेप आहे.” असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसंच कराची स्वीट्सच्या व्यवस्थापकांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 6:25 pm

Web Title: demand for changing karachi sweets name is not shiv senas official stance sanjay raut msr 87
Next Stories
1 “मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, शिवसेनेशी युतीची गरज नाही”
2 मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी
3 कराची स्वीट्सला ‘मनसे’ दणका; न्यायालयात खेचण्याची तयारी
Just Now!
X