उन्हाळ्याच्या तोंडावर वातानुकूलित यंत्रांना ग्राहकांकडून मोठी मागणी

गुढीपाडवा दोन दिवसांवर आला तरी ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना म्हणावी तशी मागणी नसल्याने यंदाही या बाजाराची सर्व मदार मोबाइल, लॅपटॉपप्रमाणे वातानुकूलित यंत्रांवर असेल. उन्हाच्या झळा वाढू लागल्याने ग्राहकांकडून सध्या फक्त वातानुकूलित यंत्रांकरिता विचारणा होत आहे. त्यातही वीजबचत करणाऱ्या एसींना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

गुढीपाडव्याचे निमित्त साधून वीजबचतीचा दावा करणारे अनेक एसी बाजारात दाखल होत आहेत. उत्पादनावरील वॉरंटी, ‘एक्स्चेंज ऑफर’ यामुळे ग्राहकांचा कल वातानुकूलित यंत्रांकडे आहे. इतर वस्तूंचा बाजार तुलनेत थंडच आहे. त्यातल्या त्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांकडून मोबाइल किंवा लॅपटॉपला मागणी येते. त्यामुळे शनिवार-रविवार जी काही खरेदी होईल, त्यावरच दुकानदारांची सर्व मदार असेल.

ऑनलाइन बाजाराचा फटका शोरूममधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीवर झाला आहे. त्यातच उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा फटकाही या बाजाराला बसत आहे. यंदा दुकानांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त विशेष सवलतींचे फलक मोठय़ा प्रमाणात दिसत नसल्याने ग्राहकांचीही लगबग कमीच होती. मात्र, साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला मराठी भाषकांकडून आजही तितकेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मागणी वाढेल, असा विश्वास व्यावसायिकांना वाटतो आहे. विजय सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गुप्ता यांच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्य़ांनी विक्री वाढेल.

‘‘वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना दुकानदारांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या सवलती यामुळे खरेदी करणे सोयीचे झाले आहे. त्यातच मध्यमवर्गीय ग्राहकालाही परवडतील अशी वातानुकूलित यंत्रे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे वीजबचत करणाऱ्या वातानुकूलित यंत्रांकडे ग्राहक आकर्षित होत आहेत,’’ असे ‘टाटा क्लिक’च्या इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख सिद्धार्थ श्रीनिवासन यांनी सांगितले.

यंत्राच्या किमतीपेक्षा त्यामुळे येणारी वीज देयके मध्यमवर्गाला परवडणारी नसतात. त्यांच्याकरिता वीजबचत करणाऱ्या यंत्रांना मागणी असते. वातानुकूलित यंत्रासोबतच एक दरवाजा असलेल्या फ्रिजलाही उत्तम मागणी असल्याचे ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व ईव्हीपी कमल नंदी यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात वातानुकूलित यंत्रांच्या मागणीत २० ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाली. यंदा ती आणखी वाढेल. गेल्या वर्षीही झालेल्या विक्रीतही वीज वाचविणाऱ्या एसींचा टक्का ३३ इतका होता. नव्या उत्पादनांच्या बदल्यात जुनी उत्पादने घेण्याच्या (एक्स्चेंज ऑफर) योजनेमुळे ही मागणी वाढली आहे.

– फरिद सारंग, व्यवसाय व्यवस्थापक, क्रोमा, इन्फिनिटी रिटेल लिमिटेड