मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सुरू असलेली प्राथमिक चौकशी करण्यास राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी असमर्थता दर्शवली. तसे पत्र पांडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिल्याचे समजते.

सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटींच्या लाचेबाबत आरोप केला होता. तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी त्यांनी न्यायालयात याचिकाही केली. त्यानंतर गृहविभागाने त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पांडे यांना दिले. तसेच गावदेवी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सिंह यांच्याविरोधात स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली. तीही पांडे यांच्याकडेच सोपविण्यात आली. मात्र सिंह यांनी अन्य एक याचिका करत पांडे यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला, असा आरोप केला. त्यानंतर पांडे यांनी ही भूमिका घेतली.