13 August 2020

News Flash

इमारतीवरून उडी घेऊन हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले.

(संग्रहित छायाचित्र)

 

मुंबई : ऑपेरा हाऊस जवळील १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून मंगळवारी सकाळी एका ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याने उडी घेत आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा असे या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. माझ्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे, असे लिहिलेली चिठ्ठी शहा यांच्या कार्यालयातून पोलिसांना सापडली.

नेपिअन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई राहत होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांचे कार्यालय असलेल्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये,’ असे लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना शहा यांच्या कार्यालयातील टेबलावर सापडली. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 7:03 am

Web Title: diamond dealer suicide building crime news akp 94
Next Stories
1 पत्रिकेपासून पंगतीपर्यंत पर्यावरणस्नेही रेशीमगाठ
2 रेल्वेतून गृहरक्षक हद्दपार!
3 ‘करोना’मुळे कोंबडी व्यवसायाला कात्री
Just Now!
X