एसटीची आर्थिक स्थिती पाहता ४ ऑगस्टला मंत्रालयात उपमुख्यमंत्री, एसटी महामंडळ यांच्यात आर्थिक मदत, कामगारांचे वेतन यावर चर्चा होणार आहे. याबाबत तोडगा निघण्याची शक्यताही आहे.

एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.  टाळेबंदीत एसटी महामंडळाला मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे. एसटीला आर्थिक मदत करावी अशी मागणी महामंडळाबरोबरच विविध कामगार संघटनांनीही केली आहे. एसटीतील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.