आश्रमशाळा व निवासी शाळांमध्ये विद्यार्थी हजर होईपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके घरपोच करणे, वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, गावागावांत शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढणे, बँक खाती उघडणे अशी कामे देण्यात आली आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व खासगी अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळांबाबत असाच निर्णय घेण्यात आला. ठाणे व नाशिक विभागातील आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ जूनपासून हजर राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.