19 November 2019

News Flash

डोंगरी दुर्घटनेतील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

जावेदची ओळख मंगळवारीच पटली होती. तो घटस्फोटित असल्याने तांडेल क्रॉसलेन येथे एकटाच राहात होता.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जावेद इस्माइल (३४) या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. गुरुवारी त्याचा मृतदेह बहिणींच्या ताब्यात देण्यात आला. जावेदची ओळख मंगळवारीच पटली होती. तो घटस्फोटित असल्याने तांडेल क्रॉसलेन येथे एकटाच राहात होता. त्याच्या नातेवाईकांबाबत फारशी कुणाला माहिती नव्हती. त्याच्या दोन बहिणी आसपास राहातात, अशी माहिती पुढे आली. बहिणींना शोधून त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला, असे डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागडीकर यांनी सांगितले.

First Published on July 20, 2019 12:02 am

Web Title: dongri building collapse dead body handover to relative zws 70
Just Now!
X