नाताळ आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी बार पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबत आदेश जारी केले आहेत.

नाताळनिमित्ताने २४ व २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.