सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी सांगितले. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेबरोबर वीज दरासंदर्भात त्यांनी बैठक घेतली.

वीजदराबाबत राज्य वीजनियामक आयोगापुढे प्रस्ताव असून पुढील काळात होणाऱ्या जनसुनावण्यांमध्ये वीज ग्राहक संघटनेला म्हणणे मांडता येईल. आयोगाचा निर्णय झाल्यावर तो शासनाकडे येईल. तेव्हा शासन वीजग्राहकांच्या हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन राऊत यांनी दिले. शेतीपंपांची वीज बिले, नवीन वीज दर वाढ प्रस्तावास स्थगिती देणे, आदी मुद्दय़ांवर निवेदन देण्यात आले.