News Flash

‘ई पास’चे ८० टक्के अर्ज पोलिसांनी फेटाळले

कुटुबीयांचा मृत्यू आणि वैद्यकीय आणीबाणी या दोनच कारणांनी राज्याबाहेर प्रवास करण्यास मुभा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ऑनलाइन अर्जांची काटेकोर तपासणी

मुंबई : दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे परवानगी पत्र (ई-पास) मिळवण्यासाठी नागरिकांनी दाखल केलेले ऑनलाइन अर्ज पोलीस काटेकोरपणे तपासत असून पहिल्या आठवड्यात दाखल झालेल्या २५ हजार अर्जांपैकी २० हजार अर्ज पोलिसांनी फे टाळले. कु टुंबीयाचा मृत्यू किं वा आजारपण अशी कारणे देऊन जिल्हा, राज्याबाहेरील प्रवासाचे नियोजन केलेल्यांचाही त्यात समावेश आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी २३ एप्रिलला जिल्हा, राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी पोलिसांकडून ई-पास घेणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले. ई-पाससाठी पोलिसांकडे २४ एप्रिलनंतर अर्ज येण्यास सुरुवात झाली. ३० एप्रिलपर्यंत २५ हजार ५८३ अर्ज आले असून त्यापैकी पाच हजार ७८६ अर्ज मंजूर करत उर्वरित १९ हजार ७९७ अर्ज फे टाळण्यात आल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिली.

कुटुबीयांचा मृत्यू आणि वैद्यकीय आणीबाणी या दोनच कारणांनी राज्याबाहेर प्रवास करण्यास मुभा आहे. तर कु टुंबीयाचा मृत्यू, वैद्यकीय आणीबाणी, स्थानिक यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी, लग्न आदी कारणांसाठी जिल्ह्याबाहेर प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. वैयक्तिक तपशील न दिल्याने, कारण किं वा निमित्त दुजोरा देणारी कागदपत्रे न जोडल्याने अनेक अर्ज पोलिसांनी फे टाळले आहेत. यंदा ई-पास देण्याची जबाबदारी शहरातील प्रत्येक परिमंडळाच्या उपायुक्तांकडे देण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील अर्जावर परिमंडळ उपायुक्त निर्णय घेत आहेत. शहरातील अर्ज मंजुरीचे प्रमाण सरासरी २० टक्क्यांवर असले तरी काही परिमंडळांमध्ये ते पाच ते १० टक्केच मर्यादित आहे. उपनगरातील एका परिमंडळाकडे पहिल्या आठवड्यात सुमारे चार हजार अर्ज सादर झाले. त्यापैकी सुमारे तीनशेच अर्ज मंजूर झाले आणि ई-पास देण्यात आले.

अर्जांची शहानिशा

कारण स्पष्ट करणारी कागदपत्रे जोडलेल्या अर्जांची पोलिसांनी शहानिशा सुरू केली. काही प्रकरणात कागदपत्रे असूनही संशय आल्यास पोलिसांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून खातरजमा केली. अशा चौकशीतून अनेक अर्जातील कु टुंबीयांच्या आजारपणाचे कारण खोटे असल्याचे समोर आले. काही प्रकरणांमध्ये डॉक्टरने संबंधित व्यक्तीची प्रकृ ती स्थिर असून नातेवाईकाने घाई करून इथवर येण्याची आवश्यकता नाही, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ते अर्जही पोलिसांनी फे टाळून लावले. कु टुंबीयांचा मृत्यू, असे कारण देणाऱ्या अर्जदारांकडून मृत्यू प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृत्युपत्र लगोलग मिळत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक डॉक्टरने दिलेले प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे पत्र आदी कागदपत्रे मागवून, खातरजमा करूनच ई-पास वितरित करण्यात आल्याचे सांगितले. लग्नाचे कारण देणाऱ्यांचीही अशाचप्रकारे झाडाझडती घेण्यात आल्याचे त्याने स्पष्ट के ले.

जिल्ह्याच्या हद्दीवर  ई-पासची तपासणी

राज्यातील प्रत्येक जिल्ह् याच्या वेशींवर पोलिसांनी तपासणी नाके  उभारले आहेत. आरोग्य विभाग, स्थानिक यंत्रणांनी प्रतिजन चाचणी, तापमान मोजणी आदीसाठी मनुष्यबळ नेमले आहे. कोकणात पर्यायाने रत्नागिरीत उतरणारा एकमेव मार्ग असल्याने पोलीस, आरोग्य विभागाने कशेडी बंगला येथे नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची झाडाझडती सुरू के ली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकु मार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने दिलेल्या आदेशांनुसार तपासणी सुरू आहे. ई-पासशिवाय प्रवास करणाऱ्यांवर शासनाच्या आदेशांनुसार कारवाई के ली जात आहे.

कोकणात जाण्यासाठी अर्ज अधिक

कोकणात प्रवासासाठी सादर झालेल्या अर्जांची संख्या अधिक असल्याचे निरीक्षण पोलीस नोंदवतात. वैद्यकीय आणीबाणी, मृत्यू, लग्न आदी कारणांसोबत आंबा वाहतुकीसाठी प्रवास परवानगी मागणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:17 am

Web Title: eighty per cent of e pass applications were rejected by the police akp 94
Next Stories
1 ज्येष्ठ नागरिक, अपंगांना गाडीतच लस
2 मालिकांच्या निर्मितीचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढला
3 टाळेबंदीमुळे कलादालनांतील कलाकृतींना धोका
Just Now!
X