गेल्या दोन तासांपासून विस्कळीत असलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. विरार स्थानकावर केबल बॉक्समध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर असेल्या केबल बॉक्सला शॉक सर्किट  होऊन आग लागली होती. या संपूर्ण प्रकारामुळे सिग्नल यंत्रणेला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेची वाहतुक वसईपर्यंत सुरू होती.

आगीमुळे विरार स्थानकावरच प्लॅटफॉर्म क्रमांक १ पूर्ण रिकामी करण्यात आले आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने सर्व सिग्नल कार्यान्वीत झाले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतुक गेल्या आठवड्याभरातून दुस-यांदा विस्कळीत झाली.

img-20160816-wa0004_147135747019_830x553