News Flash

Exclusive Video : धक्कादायक! CST स्थानकात एक्स्प्रेसमध्येच तरुणीसमोर तरूणाचे अश्लिल चाळे

महिलांच्या सुरक्षेचं काय?

सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर उभ्या असलेल्या 'तपोवन एक्स्प्रेस'मध्ये हा प्रकार घडला

मुंबई हे शहर देशातल्या इतर कोणत्याही शहरांपेक्षा महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं, पण गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटना समोर येत आहेत की हे शहर महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न कोणत्याही महिलेला पडू शकेल. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या लोकलमध्ये एक तरूण हस्तमैथुन करत होता, पीडित तरूणीने यावरून हटकले असता तरूणीला बलात्कार करण्याची धमकी या तरूणाने दिली. बिचाऱ्या तरूणीने मदतीसाठी पोलिसांना फोन केला तर त्यांनी तिचीच खिल्ली उडवली. हा प्रकार ताजा असताना २२ वर्षांच्या तरूणीला देखील असाच वाईट अनुभव आलाय.

संबंधित तरूणी कामानिमित्त नाशिकला जात होती. यावेळी सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये एक तरूण तिच्याकडे रोखून पाहत हस्तमैथुन करत होता. सीएसटीवरून ही ट्रेन सकाळी सव्वासहाला निघते. ती वेळेच्या आधीच तिथे पोहोचली होती. ट्रेन सुटायला काही मिनिटांचा अवधी असल्याने ट्रेनमधले दिवे बंद होते. तेव्हा अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे पाहून या तरूणाने अश्लिल चाळे करायला सुरूवात केली. ती मैत्रिणीची वाट बघत प्लॅटफॉर्मवरच उभी होती तेव्हा तिला पाहताच या तरूणाने पँटची झिप उघडून तिच्यादेखतच हस्तमैथुन करायला सुरूवात केली या प्रकारामुळे घाबरल्याने ती दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्या समोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. तिने त्याचा व्हिडिओही काढला. कदाचित आपल्याला आलेल्या वाईट अनुभवावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून पुरावा म्हणून तिने याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं.

जे घडतंय ते खूपच चुकीचं आहे आणि याची माहिती पोलिसांना द्यायला हवी म्हणून ती या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिसांकडे पोहोचली. पण तिला आलेला अनुभव हा यापेक्षाही वाईट होता. ‘लोकसत्ता ऑनलाईन’कडे आपला अनुभव सांगताना संबंधित तरुणी म्हणाली की, “लोहमार्ग पोलिसांकडून मला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. माझ्यासोबत जे काही घडले त्याचा पुरावा म्हणून मी व्हिडिओ पोलिसांना दाखवला पण हे काय नेहमीचंच असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. एक पोलीस तर व्हिडिओ पाहून निघूनही गेले”
“आपल्या आग्रहाखातर एक पोलीस तिथे आले, पण त्यांचा चेहराही फार त्रासलेला होता. मी या पोलिसांना काय घडलं ते सांगितलं. पण या तरूणाला पकडून त्याच्यावर कारवाई करणं तर दूरच राहिलं पण तुम्ही दुसरीकडे निघून जा, असा सल्ला या पोलिसाने दिला. त्याचं या ट्रेनमध्ये आरक्षण असेल तेव्हा यावर काहीच करता येऊ शकत नाही असं सांगून पोलीस निघून गेले आणि पोलिसांना पाहताच त्या तरुणानेही पळ काढला.”, असेही ती म्हणाली.

घडलेल्या संपूर्ण प्रकराचा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केलाय. संबंधित तरुणी मूळची पुण्याची आहे. कामानिमित्त मुंबईत आलीये. महिलांसाठी मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे असं ती ऐकत आली होती. पण मुंबईबाबतचा तिचा अनुभव मात्र सगळ्यात वाईट होता. गेल्या आठवडाभरात असा अनुभव आलेली ही दुसरी घटना आहे. असे अनुभव अनेकींना आले असतील किंवा येतीलही. अशावेळी पोलिसांकडून महिलांना सहकार्याची अपेक्षा असते. पण असे प्रकार जर ते गांभीर्याने घेतच नसतील तर महिलांच्या सुरक्षेचं काय? हा प्रश्न उपस्थित होतो.

प्रतिक्षा चौकेकर/विश्वास पुरोहित

pratiksha.choukekar@indianexpress.com

vishwas.purohit@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:10 pm

Web Title: exclusive video girl caught a guy masturbated in tapovan express train at cst and police did nothing
Next Stories
1 ५६ इंच पोलादी छाती असूनही रक्तपात का थांबला नाही?; उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
2 प्रवेशाचा कट-ऑफ खाली!
3 विकास आराखडय़ावरील चर्चेतून नगरसेवक बाद
Just Now!
X