करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशभरातील रेल्वेसह मुंबईतील लोकल सेवासुद्धा बंद करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू अनलॉकदरम्यान फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र यामुळे सामान्य प्रवाशांची कामावर जाताना अक्षरश: फरपट होतेय. दुसरीकडे अन्य सार्वजनिक वाहतुकीवरही ताण आला आहे. मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी का होत आहे आणि ते सुरू करणं इतकं सोपं का नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या..

ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे असं वक्तव्य मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. एवढंच नाही तर खासगी कार्यालयं २४ तास सुरु राहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये येण्याची मुभा राहिल, असंही ते म्हणाले.